आसामातील कैद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागवली माहिती

दहा वर्षातील घुसखोरांबाबतही मागवली माहिती

नवी दिल्ली: आसामात सध्या किती स्थानबद्धतेची केंद्रे आहेत आणि तेथे गेल्या दहा वर्षांपासून किती विदेशी नागरीकांना कैदेत ठेवण्यात आले आहेत याची माहिती सादर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. न्या रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज हा आदेश दिला आहे. आसामातील डिटेंशन सेंटर्सची सध्याची स्थिती अत्यंत भीषण असून तेथे अनेक विदेशी नागरीकांना दीर्घ काळापासून बेकायदेशीरपणे केैदेत ठेवण्यात आले आहे असा दावा एका याचिकेत करण्यात आला आहे त्या याचिकेच्या सुनावणीच्या अनुषंगाने हा आदेश देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसामात आत्तापर्यंत किती लोकांना विदेशी नागरीक म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि त्यांच्यापैकी किती जणांना आत्तापर्यंत देशाबाहेर घालवून देण्यात आले आहे याचीही माहिती सादर करा असा आदेश न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय हद्दीत बेकायदेशीररित्या घुसलेल्यांची माहिती सरकारने ठेवली आहे काय आणि ती तशी ठेवली असेल तर त्याचीही आकडेवारी सादर करा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. येत्या तीन आठवड्यात ही माहिती सादर करण्यास सरकारला सांगण्यात आले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)