आसाममध्ये पोलिस गोळीबारात दोन ठार

गुवाहाटी: आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील न्यू हाफलाँग रेल्वेस्थानकावर शुक्रवारपासून सुमारे ११०० प्रवासी अडकून पडले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळला आहे. लोकांनी शुक्रवारी राज्यातील अनेक रेल्वेमार्ग उखडून फेकले.
जिल्हाधिकारी देवा ज्योती हजारिका यांनी याविषयी माहिती दिली. सिलचर-ते गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस न्यू हाफलाँग स्थानकावर रोखण्यात आली. रेल्वे मार्ग उखडलेला असल्यामुळे गाडी पुढे रवाना होऊ शकली नाही. प्रवाशांना रस्त्याच्या मार्गाने पाठवण्यासाठी २५ बस मागवण्यात आल्या. तेव्हा आंदोलकांनी त्या बसेसही पुढे जाऊ दिल्या नाहीत.
रेल्वेस्थानकात अडकलेल्या लोकांसाठी शासनाने खाणे-पिणे व आरोग्यसेवा अशा जीवनावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध करून दिली अाहे. नव्याने हिंसाचार उफाळल्याचे वृत्त नाही. पण अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना सुरूच आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)