आसलेत भवानी माता मंदिरात भाविकांची गर्दी

कवठे, दि. 11 (वार्ताहर) – वाई तालुक्‍यातील आसले या गावी भवानी मातेचे पुरातन मंदिर आहे. नवरात्र ऊत्सव कालावधीत या मंदिरास जिल्ह्यातील भाविक भेटी देत असतात. महिला भविकांसह अबालवृद्धांची घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सव व उपवास शुभारंभ करण्यासाठी गर्दी होत असते. वाई सातारा रस्त्यावर असणारे आसले येथील भवानी मातेचे मंदिर हे पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी तसेच पोर्णिमेला या ठिकाणी भाविक येत असतात. सध्या नवरात्रोत्सवामुळे या मंदिर परिसरामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागत आहेत. मंदिर छोट्याशा टेकडीवर असल्याने मंदिरापासून आसपासच्या परिसराचे विलोभनीय दृश्‍य पहावयास मिळते. पायी जाण्यासाठी पायऱ्या तसेच वहानाने जाण्यासाठी मंदिराच्या पाठीमागील बाजून रस्ता करण्यात आलेला आहे. आसले ग्रामस्थांनी याठिकाणी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था व दर्शनासाठी शिस्तबद्ध नियोजन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)