आसखेड रस्त्याचे डांबरच गायब

भामा आसखेड – आसखेड फाटा ते वांद्रा या मार्गातील आसखेड ते करंजविहीरे परिसरात होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावरील डांबर गायब झाले असून रस्त्यावर खडी पसरलेली आहे. त्यामुळे अपघाताची शक्‍यता वाढली असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. तळशेतजवळ होणारी खडी, क्रशर वाहतूक तसेच पश्‍चिम भागातून माती घेऊन जाणारे डंपर यांचे प्रमाण जास्त आहे. अतिशय महत्त्वाचा असणारा या रस्त्यावरून करंजविहिरे खिंडीतून तळेगाव एमआयडीसीत सहज पोहोचता येते. धामणे मार्गे खेड, वाडा, पाईटपासून पश्‍चिमेकडील गावांकडे जाता येते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. तसेच करंजविहिरेतून पुढे पश्‍चिमेस वांद्रा भागात हा रस्ता जात असल्याने 20 ते 25 गावांतील नागरिकांना हाच मार्ग सोयीस्कर असूनही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)