आसखेड ते करंजविहिरे प्रवास म्हणजे “नरकयातना’

भामा आसखेड- खेड तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळते. त्यात आसखेड ते करंजविहिरे या रस्त्यावर तळी निर्माण झालेली आहेत. खड्डेयुक्‍त रस्त्यांमुळे मानवी जीवन सुकर होण्याऐवजी कष्टप्रद झाले असून या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे एकप्रकारे नगरकयाताना भोगण्यासारखे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गडद ते वांद्रा असा हा रस्ता असून प्रमुख जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतो. यामधील महत्त्वाचा असणारा आसखेड-करंजविहिरे या रस्त्यावरून करंजविहिरेतून पुढे पश्‍चिमेस वांद्रा भागात हा रस्ता जात असल्याने 20 ते 25 गावांतील नागरिक या रस्त्याने ये-जा करीत असता. करंजविहिरे खिंडीतून तळेगाव एमआयडीसीत सहज पोहोचता येते, तसेच करंजविहिरेच्या तळशेतमध्ये धामणेफाट्यापासून रस्ता जोडला गेल्याने पाईट, कडूस या दोन मुख्य भागातून या रस्त्यावर सतत वर्दळ सुरू असते. तसेच आसखेड-करंजविहिरे या रस्त्याला लागुन भामा आसखेड धरणातून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटीहून अधिक निधी सर्वाजनिक बांधकामविभागाकडे वर्ग करण्यात आला आहे मात्र, जलवाहिनेचे काम पूर्ण झल्यावरच रस्ता करा अशी अट घातली असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीस विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण सांगितले जात आहे.

 • तीन वर्षांत रस्त्याची दुरुस्तीच नाही
  रस्त्याचे दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकामविभागाकडे प्रति किलोमीटरप्रमाणे दुरूस्तीला निधी येतो, पण गेल्या 3 वर्षांत या रस्त्याची दुरूस्ती झाली नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी आवाज उठवून, आंदोलने करूनही प्रशासन ढिम्मच असल्याने हा रस्ता चर्चा विषय बनला आहे.
 • शिवे परिसरात रस्ता दुरुस्तीचा देखावा
  शिवे व पश्‍चिमेकडे रस्त्यांवर खड्डेच-खड्डे असून या रस्त्याचे काम दिलेल्या कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही. या रस्त्याचे कामे जूनपूर्वी पूर्ण होणे गरजे होते. मात्र, कंत्राटदाराने काही ठिकाणचे पडलेले खड्डे तात्पुरते बुजवून रस्त्याचा नट्टापट्टा केला. पण तात्पुरती टाकलेली खडी पावसात वाहुन गेली आणि रस्ता पुन्हा खड्डेमय झाला. पावसाचा जोर वाढला आणि छोट्या खड्ड्यांचा आकार वाढला आणि तो वाढतच गेला. शिवे गावठाणालागून पश्‍चिमेला भामा आसखेड धरणावर एक पूल व पुर्वेला दोन पूल असून या पुलांवर मोठे खड्डे पडले आहे. तर पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त होत असल्याने या तिनही पुलांना धोका निर्माण झाला असल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
 • शिवे परिसरातील रस्तावर दरवर्षी पावसाळ्यात मोठे खड्डे पडतात मात्र, रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. तर परिसरातील नागरिकांच्या पाचवीला हे पुजलेले खड्डे आहेत की काय असा प्रश्‍न पडला आहे. शिवे गावठाणाला लागुन असलेल्या तीन पुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातचा धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष केंद्रित करुन या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
  – रोहिदास गडदे, माजी पंचयत समिती सदस्य, खेड
 • खेड मधील वासुली फाटा ते आंबेठाण पर्यंत तसेच आसखेड फाटा ते करंजविहिरे या रस्त्याची लवकरच दुरुस्ती केली जाणार असून एम. बी. पाटील कंस्ट्रक्‍शन या कंपनीला या कामाचा ठेका मिळाला आहे.
  – संतोष पवार, शाखा अभियंता, खेड

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)