आसक्‍ती ठेऊन प्रभू नाम घेणे शक्‍य नाही!

निगडी – मोह, मायेचा, क्रोधाचा त्याग करून संत मुनिंनी दाखविलेल्या दया आणि करुणेच्या मार्गाने जीवन साधना केली तर मोक्ष प्राप्ती होते. संसारामध्ये मोह, आसक्‍ती ठेवून प्रभू नाम घेणे शक्‍य होत नाही. मनातील भाव बदला, भविष्य बदलेल. मन संसारात गुंतल्याने साधनेत व आराधनेत व्यत्यय येतो. ध्यान, भजन व प्रवचन जीवनाला प्रेरणा देतात, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी निगडी येथे केले.

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मासानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

-Ads-

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, संत गुरु आपल्याला पंच इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा मार्ग दाखवितात. क्रोध, मोह, माया, वासना दूर लोटून स्वत:मधील “स्व:’ ला ओळखा. पदाने आणि संपत्तीने माणूस मोठा होत नाही तर साधनेने आणि तपश्‍चर्येने होतो. भक्‍तीशिवाय कर्म करता येते, परंतु मोक्षप्राप्तीसाठी कर्माबरोबरच परमार्थ देखील आवश्‍यक आहे. संतांची सेवा करावी त्याचबरोबर दिनदुबळ्यांचे अश्रु पुसणे हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे. उत्तम चारित्र्य व ध्रुवासारखी अढळ भक्‍ती असावी यातून आपल्याला मानव सेवा व परम धर्माची अनुभूती येते. आपल्या पाल्यांवर ध्रुवासारखे संस्कार करा. भौतिक सुख संपत्ती त्यांना देण्यापेक्षा कर्तव्य व नितीमूल्यांच्या आचरणाबाबत त्यांना मार्गदर्शन करा त्यासाठी आपल्या मुलांना संतांचा सहवास घडू द्यावा, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)