आष्टीत शोभेच्या दारूचा स्फोट; तीन ठार

बीड – यात्रानिमित्ताने घरामध्ये साठा केलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट होऊन एकाच घरातील तीघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आष्टी शहरातील दारू गल्ली येथे घडली आहे. यामध्ये सरफराज अल्लाऊद्दीन सय्यद (वय ३८), हर्जना बेगम सय्यद अल्लाऊद्दीन (वय ६०) व फैजान या १५ वर्ष मुलाचा मृतांमध्ये समावेश असल्याचे घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोट एवढा भयानक होता की घटना घडल्यानंतर सदरील घराजवळ जाण्यासही कोणी धजवेना. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने झालेली पडझड दूर करून मृतांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, जामखेड येथील नगरपालिकेचे अग्निशमन दलाची यंत्रना घटनास्थळी दाखल करण्यात आली होती. यामध्ये तीन मृतदेह आढळून आले असून, सायंकाळी ६ नंतरही ढासळलेल्या भिती काढण्याचे काम सुरू होते.

शहरातील शेकापूर रोडलगतच दारू गल्ली म्हणून भाग आहे. सध्या यात्रांचा कालावधी असल्याने येथील गल्लीतील घरामध्येच दारू साठा केला जाातो. शुुक्रवारी दुपारी अचानक ४:३० हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)