आश्‍वी पोलिसांनी पकडला पावणेदोनशे किलो गांजा

वाहनासह सुमारे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

संगमनेर: ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आश्‍वी पोलिसांनी सुमारे पावणेदोनशे किलो गांजा पकडला. दरम्यान या कारवाईबद्दल आश्‍वी पोलिसांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनियता बाळगल्याने केवळ कारवाई सुरु असल्याची माहिती मिळाली. एका अलिशान क्रेटामधून या गांजाची वाहतूक सुरु होती. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश निवृत्ती लोणारे (रा. जोर्वे, संगमनेर) असे या आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झरेकाठी या येथून अलिशान क्रेटा भरधाव वेगाने रस्त्याकडे दुर्लक्ष करुन जात असल्याने काही ग्रामस्थांना या गाडीबद्दल संशय आला त्यांनी याची माहिती आश्‍वी पोलिसांना दिली. आश्‍वी पोलिसांनी देखील सतर्कता दाखवत ग्रामस्थांच्या माहितीच्या आधारे संबधित गाडीचा शोध सुरु केला. आश्‍वी गावापासून काही अंतरावर त्यांना संशयित क्रेटा भरधाव वेगाने जात असल्याचे दिसले. क्रेटा पंक्‍चर असतांनासुध्दा संशयित ती भरधाव वेगाने नेत असल्याने पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला. पाठलागादरम्यान एका आरोपीने गाडीतून खाली उडी मारत आडरस्त्याने पळ काढला.

पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी क्रेटा तशीच भरधाव घेऊन आश्‍वीच्या दिशेने पुढे निघून गेला. मात्र काही अंतर गेल्यावर पंक्‍चर झालेली क्रेटा त्याला रस्त्यात सोडून पळ काढावा लागला. पोलिसांनी क्रेटा पोलीस ठाण्यात आणुन तिची तपासणी केली असता तिच्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलीस उपधीक्षक अशोक थोरात, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आश्‍वी पोलिस ठाण्यात जाऊन पंचनामा करत पोलिसाना पुढील सुचना केल्या.
मात्र रात्री उशिरापर्यत या संदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याने नेमका किती रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडला याची माहिती मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)