आश्‍वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित

शेवगाव: कृषी व महसूल यंत्रणेने लावलेली चुकीची नजर पैसेवारी दुरुस्त करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात येणारे आंदोलन तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कृषी व महसूल यंत्रणेने लावलेली चुकीची नजर पैसेवारी दुरुस्त करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनाचा पवित्रा घेऊन गांधीगिरी करण्याच्या उद्देशाने गुलाब पुष्पासह तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंडल निरीक्षकांना ती दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना दिल्या, तसेच महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचीही ग्वाही दिल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

तालुक्‍यात खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम पावसाअभावी वाया गेले. ऐन हिवाळ्यात जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍न बिकट बनला, शेती ओसाड पडली, तालुक्‍यात 23 गावे व 52 वाड्या वस्त्यांना टॅंकर चालू आहेत. ही वस्तुस्थिती असताना यंत्रणेने सर्वत्र आबांदो आबाद असल्याची भलावण केली. कृषी व महसूल यंत्रणेने तालुक्‍यातील 79 गावाची नजर आणेवारी 50 पैशापेक्षा अधिक लावून शेतकऱ्यांची हेटाळणी केली आहे. वाढीव आणेवारीमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानास मुकावे लागेल म्हणून ती त्वरित दुरुस्त करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गांधीगिरी करणार होते. मात्र त्या आगोदरच संघटनेचे दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, संदीप मोटकर, बाळासाहेब फटांगरे, प्रवीण म्हस्के यांनी तहसीलदार भामरे यांना निवेदन देऊन चर्चा केली, तेव्हा त्यांनी दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे प्रश्‍न मार्गी लागल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)