आश्‍वासनानंतर वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित

ढेबेवाडी – वांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी 1 जानेवारीपासून सुरु केलेले बेमुदत बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय धरणग्रस्त कृती समितीने घेतला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे 30 जानेवारी पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी धरणग्रस्त कृती समितीचे प्रतिनिधी व अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अधिक्षक अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे व तहसीलदार निंबाळकर यांच्यात सकारात्मक बैठक झाली. या बैठकीत निगडे गावच्या 117 प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेचा मागणी प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला जाईल. याबाबत निगडे येथे शनिवारी 5 रोजी बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले होते. निगडे येथेच संबंधित कुटुंबांना गावठाण उपलब्ध करण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिंती धरणग्रस्तांना 30 जानेवारी पर्यंत मंजूर रक्कम वाटप केली जाईल. कराड तालुक्‍यातील निकृष्ट जमिनीवर गावठाण मागणी केली जाणार आहे. जिंती धरणग्रस्तांच्या निर्वाह भत्याचा योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. शिंदेवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी, जितकरवाडी या गावांची पाहणी करुन त्यांची दळणवळणाची सोय उपलब्ध करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. याबाबत 7 तारखेला कार्यकारी अभियंता पाहणी करुन निर्णय घेतील.

मराठवाडी-जाधवववाडी येथील 48 धरणग्रस्तांची तपासणी करुन शिल्लक रक्कमेचा प्रस्ताव करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर 14 धरणग्रस्तांवर असलेल्या कोर्ट केसेस मागे घेण्यात येतील. याबाबत 30 पर्यंत प्रस्ताव सादर करुन मंजूरी मिळविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. यामुळे आंदोलन स्थगित केल्याचे कृती समितीचे अनिल शिंदे यांनी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)