आश्‍वासनानंतर भटक्‍या विमुक्तांचे आंदोलन मागे

भोर- शहरातील विद्यानगर येथील भटक्‍या विमुक्त समाजातील 150 कुटुंबातील लोकांना हक्‍काची घरे मिळावीत, वीज, पाणी, स्वच्छतागृह, शिधापत्रीका, जातीचे दाखले मिळावेत आदी मागण्यांसाठी 28 नोव्हेंबरपासून भोर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बहुजण कल्याण सेनेचे आंदोलन सुरू होते. आमदार संग्राम थोपटे यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर सेनेने गुरुवारी आंदोलन माघारी घेतले आहे.
नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, गटनेते सचिन हर्णसकर व सर्व नगरसेवकांनी याची दखल घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. आमदार थोपटे यांनी जिल्हाधिकारी, भोरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याकडे शासकीय भूखंडासाठी प्रस्ताव देऊन एका वर्षात हक्‍काचे घरे देण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर बहुजन कल्याण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन माघारी घेण्याचा निर्णय घेतला. कातकरी, गोसावी, वडार, गोंधळी, बेलदार आदी भटक्‍या विमुक्त समाजातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)