आश्‍वासनाच्या आणाभाका हवेत विरल्या

उरुळी कांचन- हवेली तालुक्‍यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू न झाल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. हा यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उरुळी कांचन येथील बाजारात मैदानात 4 वर्षांपूर्वी शेतकरी मेळावा आयोजित केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली होती.
आमचे सरकार सत्तेत आल्यावर थेऊर येथील बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना 3 महिन्यांत सुरू करू, असे आश्‍वासन त्यावेळी विनोद तावडे यांनी दिले होते. या आश्‍वासनाला चार वर्षपूर्ती झाली आहे. परंतु अजूनही कारखाना सुरू होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. या भागात शिरुर- हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे कोणत्याही प्रकारची त्यावेळी विकासकामे केलेली नव्हती. परंतु उरुळी कांचन येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात पाचर्णे म्हणाले होती की, हा कारखाना राष्ट्रवादी कॉंग्रेसने बंद पडला. तसेच बाजार समितीचेसुध्दा वाटोळे केले आहे. त्यामुळे आम्ही आम्हाला मतदान करा. आम्ही तुमच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. 2 वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आम्ही सत्तेवर आल्यावर 90 दिवसांत सुरू करू, असे सांगितल्यावर या भागातील शेतकरी व नोकरदारवर्गाने
भाजपाचे उमदेवार पाचर्णे यांना मताधिक्‍य दिले होते. त्यामुळे केंदात व महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आले. सरकार आल्यावर थेऊर येथील बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होईल, अशी चर्चा सभासदांमध्ये सुरू झाली. परंतु आज जवळपास 4 वर्ष होत आली तरी फक्‍त आमदार पाचर्णे हे कारखाना लवकरच सुरू होईल. असे सांगतात. परंतु कारखाना सुरू झाला तर नाही. उलट कारखान्यात मोठ्या चोऱ्या सुरू झाल्या आहेत. तसेच या भागातील रस्त्याची अतिशय वाईट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खासदार व आमदार यशवंत सहकारी साखर कारखानाविषयी काय बोलणार याची चर्चा सुरू झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)