आश्वासने पूर्ण करणे ही माझी जबाबदारी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड – मलकापूरचा इतिहास काय हे माहिती नसणाऱ्यांनी निवडणुकीत सहभाग घेतला असून एक हाती सत्ता मिळाली नाही तर विरोधकांचे फावते. विकासकामांना खिळ बसते हा माझा प्रदीर्घ अनुभव आहे. कॉंग्रेसची आश्वासने पूर्ण करणे ही मनोहर शिंदे आणि माझी जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुक प्रचारार्थ बागलवस्ती येथे ते बोलत होते. यावेळी आ. विश्वजित कदम, अजित पाटील-चिखलीकर, मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निलम येडगे, प्रकाश बागल, जयंत कुराडे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.

आ. विश्वजित कदम म्हणाले, मलकापूर व कराड दक्षिणसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आ. पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे. काल ज्यांना बाबांनी साथ दिली तीच पोरं आता त्यांच्यावर बोलत आहेत. ज्यांच्यावर संस्कार, विचार नाहीत ते आज निवडणुकीत बेताल वक्तव्ये करीत आहेत. अशा प्रवृत्तींना मतदारांनी कदापि भीक घालू नये. या निवडणुकीत विरोधकांचा पराभव निश्‍चित असून मतदारांनी त्यांना त्यांची जागा मतदानाने दाखवून द्यावी, असेही आवाहन आ. कदम यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोहर शिंदे म्हणाले, ज्या व्यक्ती मलकापूर- आगाशिवनगरमध्ये 2013 च्या मतदार यादीत नाव आहे. त्यांना घरे देण्यास बांधील आहे. ज्या ठिकाणी राहताय ती जागा तुमच्या नावावर करण्यात येईल, ती प्रक्रिया नगरपालिका करणार आहे. मलकापूर विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी लोकसहभागातून सातत्याने पाठपुरावा करुन विविध योजना राबवून यशस्वी केल्या. व मलकापूरचे नाव संपूर्ण देशात पोहचवले. त्यामुळे मलकापूर मधील शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे मलकापूर नगरपरिषद होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या प्रक्रियेतही विरोधक मंडळींनी अडकाठी केली. मलकापूरमध्ये केवल राजकारण करीत नागरीकांची दिशाभूल करण्याचे उद्योग या मंडळींनी केले आहेत. यासाठी मलकापूरवासियांनी अशा विकासकामांना खो घालणाऱ्या प्रवृत्तींना हद्दीबाहेरच ठेवण्याचे काम मतदानाद्वारे करावे. प्रास्तावीक अमोल जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)