आश्वासनाबाबत आपण काही बोललोच नव्हतो ! गडकरींचा युटर्न !

मुंबई: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक वक्तव्य केले होते. “आम्ही सत्तेत कधीच येणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठी मोठी आश्वासने देण्याचा सल्ला दिला होता.” गडकरींच्या या विधानामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. मात्र मी असे बोललोच नव्हतो, असा युटर्न गडकरींनी घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी मोदी किंवा 15 लाखांच्या आश्वासनाबाबत आपण काही बोललोच नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी राहुल गांधींचा देखील चिमटा काढला. “मुलाखत मराठीमध्ये होती आणि राहुल गांधींना कधीपासून मराठी यते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते नितीन गडकरी ?
“आमचा सगळ्यांचा एवढा एवढा दृढ विश्वास होता, इतका प्रखर आत्मविश्वास होता की आयुष्यात आम्ही कधी सत्तेवर येतच नाही. त्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक म्हणायचे बोला ना, सांगा ना, बिघडतंय काय ? फडणवीस काय बोलले जनता आम्हाला त्या आश्वासनांची आठवण करून देते. मात्र आम्ही सध्या त्यावर हसतो आणि पुढे निघून जातो” असे गडकरींनी सांगितले.
-Ads-

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)