आश्रम शाळेत जागतीक आदिवासी दिन साजरा

वडगाव-मावळ, (वार्ताहर) – माळेगाव खुर्द, ता. मावळ येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेत जागतीक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बहुसंख्य आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

अध्यक्षस्थानी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव सुपे होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नागू ढोंगे, शकुंतला बोऱ्हाडे, भिमाजी ठोंगीरे, राजेश कोकाटे, राघुजी तळपे, प्रमिला भालके, काळुराम वाजे, शांताराम बगाड, बंडू ठाकर, श्रीरंग चिमटे, शिवराम सुपे, रामचंद्र विरणक, सदाशिव ढोंगे, नाथा चिमटे, अशोक सुपे, विष्णू मोरे, रामचंद्र विरणक उपस्थित होते.

सत्तर वर्षे उलटूनही मूळ आदिवासींना जातीचे दाखले मिळाले नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्‍त केली. दीड लाख लोकांनी आदिवासी असल्याचे खोटे दाखले जोडून नोकऱ्या मिळवल्या. त्याविरूद्ध कारवाई करून मूळ आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, असा ठराव मांडण्यात आला. आदिवासींनी जंगल आणि वन न संभाळता शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी गाव सोडावे, असा नारा देण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींनी बलिदान दिले आहे. याची जाणीव ठेवून शासनाने सर्वच शाळांत आदिवासी दिन साजरा करावा, अशी मागणी विष्णू गोडे यांनी केले.

जयवंत मोरमारे यांनी “आदिवासी हक्‍कांसाठी लढू’ कविता सादर केली. विद्यार्थ्यांना वीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांची माहिती दिली. प्रा.अशोक मोरमारे यांचे व्याख्यान झाले. गुलाब चिमटे यांनी राघुजी यांचा पोवाडा सादर केला.
जागतीक आदिवासी दिनी मावळ तालुका आदिवासी उन्नती संघटनेने अंतू हिलम, काशीनाथ मोरमारे, नारायण चिमटे, बळिराम कोकाटे, विक्रम हेमाडे, बजरंग लोहकरे आदींना समाजरत्न पुरस्काराने गौरवले. दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

येथील शिक्षण संस्थेने महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी झंपू ताटे यांनी केली. जालिंदर मेटल, विरणक, भिकाजी धराडी यांचे भाषण झाले. संयोजन उमाकांत मदगे, अंकुश चिमटे, मनोहर गाटे, लक्ष्मण वासावे, सुरेश काठे, बाळासाहेब निसाळ, जयवंत गवारी, रामदास गभाले, राघू मोरमारे, संतोष हिले, पप्पू मदगे आदींनी केले. प्रास्ताविक मारुती खामकर यांनी केले. सूत्रसंचालन कुंडलिक लोटे यांनी केले. शिवराम सुपे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)