आश्रमशाळेत प्रवेश न मिळाल्यास आंदोलन

ग्रामस्थ, शिवसेनेचे डॉ. तळपाडे यांचा इशारा
वसतिगृह प्रवेश क्षमता वाढवण्याची मागणी
पालक पाल्याच्या प्रवेशाबाबत झाले चिंतातूर

अकोले – तालुक्‍यातील 15 गावांतील विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक वर्गातील प्रवेशाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. वसतिगृह प्रवेश क्षमता आणि तुकडी वाढ प्रश्‍नावर शिवसेनेचेनेतेडॉ. शरद तळपाडे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
केळी – रुम्हणवाडी येथेशासकीय आश्रमशाळा आहे. येथे पहिली ते बारावीचे वर्ग आहेत. या भागातील सर्वच आदिवासी मुले येथे शिक्षणासाठी येत असल्यानेहे गाव महत्त्वाचेकेंद्र आहे. येथे सर्वच आदिवासी शेतकरी आपली मुले व मुली यांना शिक्षणासाठी प्रवेश निश्‍चित करीत आलेले आहेत. केळी -रुम्हणवाडी शाळेचा सलग पाच वर्षांपासून 10 वीचा निकाल चांगला लागत आहे.

परंतु 11वी प्रवेशाला सर्वउत्तीर्ण विद्यार्थ्यांना नकार मिळत आहे कारण वसतिगृहात प्रवेशाला मर्यादा आल्या आहेत. शिवाय तुकड्या वाढ नसल्यानेमुलांच्या आणि मुलींच्या प्रवेशाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यामुळेपालक आपल्या पाल्याच्या प्रवेशाबाबत चिंतातूर बनले आहेत. राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात डॉ. शरद तळपाडेआणि त्यांच्याबरोबर इतर पक्षीय कार्यकर्त्यांनी तुकडी वाढ आणि वसतिगृह प्रवेश क्षमता वाढ व्हावी, असेनिवेदन प्रकल्पाधिकाऱ्यांना दिले. यावेळी 15 गावांचेग्रामस्थ उपस्थित होते.

केळी रुम्हणवाडी, सांगवी, पाडोशी, पिंपळदरावाडी, एकदरे, खिरविरे, बिताका, कोकणवाडी, पेढेवाडी, तिरढे, पाचपट्टा, म्हाळुंगी, जायनावाडी या आणि अन्य गावातील ग्रामस्थांनी आमच्या पाल्यांच्या भविष्याचा विचार प्रकल्प कार्यालयाने करावा, आमच्या पाल्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळणारी पावले शासनाने टाकावीत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)