आशिष खेतान यांनीही सोडली आम आदमी पार्टी

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आशिष खेतान यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार आशुतोष यांनी गेल्याच आठवड्यात पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्या पाठोपाठ पक्षाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.

आपण राजीनामा दिला असल्याच्या वृत्ताला खेतान यांनी ट्विटरवरून दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की आपण आताच्या घडीला सक्रिय राजकारणापासून दूर झालो आहोत. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 15 ऑगस्टलाच पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. त्याच दिवशी आशुतोष यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. दिल्ली डायलॉग आणि विकास आयोगावर त्यांनी काम केले होते.

तथापी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षामुळे आपण निराश झालो आहोत असे नमूद करून त्यांनी या आयोगाच्या सदस्य पदाचा गेल्या एप्रिल महिन्यातच राजीनामा दिला होता. पक्षातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पक्षाकडे सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी नवी दिल्ली लोकसभा मतदार संघाकडून उमेदवारी मागितली होती. पण त्यांना पक्षाकडून अनुकुल प्रतिसाद मिळू शकला नाही म्हणून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)