आशिष खेतान यांचा राजीनामा 

नवी दिल्ली – दिल्ली डायलॉग आणि दिल्ली डेव्हलपमेंट कमिशनचे उपाध्यक्ष आशिष खेतान यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाचे नेते असलेले खेतान यांनी म्हंटले आहे की आपल्याला आता पुन्हा वकिली सुरू करायची असल्याने आपण या पदाचा राजीनामा देत आहोत. खेतान हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्ती मानले जातात. तीन वर्षांपुर्वी त्यांची या कमिशनच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती.

स्वत: केजरीवाल हे या कमिशनचे अध्यक्ष आहेत. राजीनामा पत्रात त्यांनी आपल्याला ही संधी दिल्याबद्दल केजरीवालांचे आभारही मानले आहेत. मला पुन्हा वकिली सुरू करायची असल्याने मला या पदावर राहाता येणार नाही त्यामुळे आपण हा राजीनामा देत आहोत. नाराजीतून त्यांनी राजीनामा दिलेला नाही हेही त्यांनी यानिमीत्ताने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)