आशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार

16 देशांतील 66 खेळाडूंचा असणार सहभाग
नवी दिल्ली – नवी दिल्ली येथे रंगणाऱ्या “बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स (बीडब्ल्यूबी) या 10व्या आशियाई शिबिरामध्ये सहभागी होणारे 66 पुरुष – महिला खेळाडू जाहीर झाले आहेत. या शिबीरात 16 देशांतील युवा बास्केटबॉलपटू सहभागी होणार असल्याची माहिती शिबिर आयोजकांनी दिली. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए), आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (एफआयबीए) आणि भारतीय बास्केटबॉल महासंघ (बीएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे 30 मे ते 2 जून दरम्यान पार पडेल.

या शिबिरात सहभागी होणाजया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. युवा खेळाडूंना या वेळी अमेरिकेच्या ओकलाहोमा सिटी थंडरचे कोरे ब्रेवर, ब्रुकलिन नेट्‌सचे कॅरिस लेवर्ट, कॅनडाचे मियामी हीट क्‍लबचे कॅली ओलेनिक, डलास मावेरिक्‍सचे ड्‌वाइट पॉवेल आणि डब्ल्यूएनबीएचे माजी खेळाडू एबॉनी हॉफमान यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल.

बीडब्ल्यूबी आशिया शिबिर सुरू होण्याआधी 27 ते 29 मे दरम्यान बास्केटबॉल डेव्हलपमेंट शिबिर पार पडणार असून यामध्ये भारतातील निवडक 18 महिला खेळाडू सहभागी होतील. या सर्व खेळाडूंना शिबिराच्या प्रायोजकांच्या वतीने मोफत जर्सी व बुट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 2001 सालापासून आयोजित करण्यात येत असलेले बीडब्ल्यूबी आशिया शिबिर आतापर्यंत 127 देशांमध्ये आयोजित करण्यात आले असून, यामध्ये एकूण 3,190 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील 50 खेळाडूंना एनबीए ड्राफ्टमध्येही जागा मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)