आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामन्यांना आयसीसीचा वन डे दर्जा

दुबई: अनेक संघांचा समावेश असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेला अधिकृतपणे “वन डे’ दर्जा देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज जाहीर केला. सहभागी संघांमध्ये अधिकृत आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या किंवा नसलेल्या संघांचा सहभाग असला, तरी हा निर्णय लागू होणार असल्याचेही आयसीसीने म्हटले आहे.

आयसीसीचा हा निर्णय दुबईत होणाऱ्या आगामी आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेपासून लागू होणार आहे. अर्थात हा निर्णय सध्या प्रायोगिक स्वरूपात असून सहा महिने पाहणी केल्यावर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे आयसीसीचे कार्यकारी प्रमुख डेव्ह रिचर्डसन यांनी म्हटले आहे. आयसीसीचा वन डे दर्जा नसलेल्या हॉंगकॉंग संघाने पात्रता फेरीतील अंतिम सामन्यात संयुक्‍त अरब अमिरातीला पराभूत करून आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची कामगिरी केल्यामुळे पेच निर्माण झाला होता.

आशियाई चषक स्पर्धेतील सहा संघांमध्ये हॉंगकॉंग हा एकच संघ अधिकृत मान्यता नसलेला आहे. त्याआधी झिम्बाब्वे येथे या वर्षारंभी पार पडलेल्या विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतील निवडक सामन्यांनाच वन डे दर्जा देण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यातही हॉलंड हाच एक अनधिकृत संघ होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)