आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : अफगाणिस्तानचे श्रीलंकेसमोर  250 धावांचे आव्हान

 थिसारा परेराचे पाच बळी 
अबू धाबी, दि. 17 – मोहम्मद शेहझाद व इहसानुल्लाह यांची दमदार सलामी आणि रहमत शाहचे झुंजार अर्धशतक यामुळे आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात अफगाणिस्तानला श्रीलंकेसमोर विजयासाठी 250 धावांचे आव्हान ठेवता आले. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. परंतु श्रीलंकेकडून थिसारा परेराने 55 धावांत 5 बळी घेताना अफगाणिस्तानचा डाव निर्धारित 50 षटकांत सर्वबाद 249 धावांवर रोखला.

अनुभवी मोहम्मद शेहझाद व इहसानुल्लाह या जोडीने अफगाणिस्तानला 11.4 षटकांत 5 धावांची सलामी देत दमदार पायाभरणी करून दिली. शेहझाद 4 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 34 धावा करून परतल्यावर इहसानुल्लाहने 6 चौकारांसह 45 धावा करताना रहमत शाहच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 13 षटकांत 50 धावांची भागीदारी करून अफगाणिस्तानची आगेकूच कायम राखली.

-Ads-

इहसानुल्लाह बाद झाल्यावर असगर अफगाण लगेचच परतला. परंतु रहमत शाहने 90 चेंडूंत 5 चौकारांसह 72 धावांची खेळी करताना हशमतुल्लाह शाहिदीच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 15.1 षटकांत 80 धावांची भागीदारी करून अफगाणिस्तानचा डाव सावरला. रहमत शाहचे हे 12वे एकदिवसीय अर्धशतक ठरले. चमीराने रहमतला बाद केल्यानंतर केवळ 13 धावांची भर पडल्यावर हशमतुल्लाहला बाद करीत थिसारा परेराने अफगाणिस्तानची आगेकूच रोखली.
हशमतुल्लाहने 52 चेंडूंत 2 चौकारांसह 37 धावा केल्या. त्यानंतर मलिंगाने महंमद नबीला (15) तर परेराने नजिबुल्लाह झादरानला (12) बाद करीत अफगाणिस्तानची घसरगुंडी घडवून आणली. परेराने अखेरच्या षटकांत गुलबदिन नायब, रशीद खान व मुजीब उर रेहमान यांना बाद करीत अफगाणिस्तानचा डाव सर्वबाद 249 धावांवर गुंडाळला.

 धावफलक- 
अफगाणिस्तान- 50 षटकांत सर्वबाद 249 (रहमत शाह 72, मोहम्मद शेहझाद 34, इहसानुल्लाह 45, हशमतुल्लाह 37, थिसारा परेरा 55-5, अकिला धनंजया 39-2, मलिंगा 66-1).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)