आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतासमोर आज दुबळ्या हॉंगकॉंगचे आव्हान

दुबई – विश्‍वचषकाखालोखाल महत्त्वाची समजली जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ आपला सलामीचा सामना उद्या (मंगळवार) खेळणार असून बलाढ्य “टीम इंडिया’समोर दुबळ्या हॉंगकॉंगचे आव्हान आहे. कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेतून विश्रांती घेतल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात भारतीय संघ कशा प्रकारे कामगिरी करतो, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

त्यातच उद्याच्या सामन्याकडे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाला मिळालेला सराव सामना म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात हॉंगकॉंगचा एकहाती पराभव करून स्पर्धेची धडाक्‍यात सुरुवात केली. त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघ पहिल्या सामन्यात कशा प्रकारे कामगिरी करतो ते पहाणॅ औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
दरम्यान, आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना चांगला सराव मिळावा म्हणून बीसीसीआयने अ संघातील पाच गोलंदाजांना दुबईला पाठवले होते. त्यांचा उपयोग करून घेत भारतीय संघाने नेटमध्ये कसून सराव केला आहे. ज्यात मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिद्ध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम व लेगस्पिनर मयंक मार्कंडे यांच्यासह श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज नुवान सेनेविरत्ने यांचा समावेश आहे. त्यामुळे हॉंगकॉंगचा संघ दुबळा असला, तरी भारतीय संघाने त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवलेला नाही हे यावरून दिसून येत आहे.

-Ads-

आजच्या सामन्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी (बुधवार, दि. 19) भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच लागोपाठ दोन दिवस दोन सामने खेळावे लागणार असल्याने भारतीय संघ पहिल्या सामन्यात हॉंगकॉंगला लवकरात लवकर पराभूत करून पाकिस्तानशी होणाऱ्या सामन्यापूर्वी पुरेशी विश्रांती घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

हॉंगकॉंगच्या संघाला आयसीसीचा एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. केवळ या स्पर्धेपुरताच आयसीसीने हॉंगकॉंगला हा दर्जा दिला आहे. परंतु पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आठ गडी राखून पराभव झाल्यामुळे त्यांच्यावर दडपण असणार आहे. पाकविरुद्ध ऐझाझ खान (27) आणि किंचित शाह (26) यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. परंतु अन्य फलंदाजांसमोर आता दर्जेदार प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे आव्हान असेल. एहसान खानने पाकविरुद्ध दोन बळी घेतले. परंतु भारताच्या बलवान फलंदाजीला रोखण्याची खडतर कामगिरी हॉंगकॉंगच्या गोलंदाजांना कशी जमते, त्यावरच या लढतीचे भवितव्य अवलंबून राहील.

प्रतिस्पर्धी संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या. भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चाहल, शार्दूल ठाकूर, दिनेश कार्तिक व खलील अहमद.
हॉंग कॉंग- अंशुमन रथ (कर्णधार), ऐझाझ खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकऑल्सन, ख्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाझ, अर्शद मोहम्मद, किंचित शाह, नदीम अहमद, राग कपूर, स्कॉट मॅककेहनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान व आफताब हुसेन.
सामन्याची वेळ- सायंकाळी 5-00 पासून.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)