आशिया चषकापूर्वीच श्रीलंकेला हादरा !

कर्णधार दिनेश चंडीमल दुखापतीमुळे संघाबाहेर

कोलंबो: अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आशिया चषक स्पर्धेपूर्वीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्‍का बसला आहे. कर्णधार दिनेश चंडीमल बोटाला झालेल्या दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. चंडीमलच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाला संघात स्थान मिळाले आहे, तर अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आशिया चषकासाठी श्रीलंकन क्रिकेट मंडळाने आपल्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. स्थानिक टी-20 क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत असताना चंडीमलच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत अजूनही बरी झाली नसल्याने चंडीमलने स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान आशिया चषकासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला निवृत्तीमधून पुनरागमन करण्यास श्रीलंकेने भाग पाडले आहे.

आशिया चषकासाठी श्रीलंकेचा संघ- अँजलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, कुशल मेंडिस, उपुल थरंगा, निरोशन डिकवेला, दनुष्का गुणतिलका, थिसारा परेरा, दसुन शनाका, धनंजय डी-सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवान परेरा, अमिला अपोन्सो, कसुन रजिथा, सुरंगा लमकल, दुष्मंता चमिरा व लसिथ मलिंगा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)