आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

काश्मीर : जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेले आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन रविवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. १५ हेक्टरवर पसरलेल्या या गार्डनमध्ये ५३ प्रकारची जवळपास १० लाखाहून अधिक ट्युलिप येत्या महिनाभरात उमलणार आहेत.

२५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत हे गार्डन पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. दरम्यान, ट्युलिपशिवाय हायसिंथ, नार्सिसस, डफोडील्स, म्युसकुरिया आणि इरीस या जातीची फुले इथे पाहायला मिळतात. पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये ट्युलिप गार्डन सुरु केले होते. ट्युलिप गार्डनमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल असा सरकारचा विश्वास आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)