video: आशियाई स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी

अखेरच्या दिवशी 2 सुवर्णांसह 1 रौप्य आणि 1 कांस्य 
जकार्ता – गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेला आशियाई स्पर्धांच्या खेळांचा थरार संपला असून शनिवारी भारताने 2 सुवर्ण पदके कमावले आहेत. बॉक्‍सर अमित पांघलने 49 किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज क्रीडा प्रकारच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले.

याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई करून भारताची पदकसंख्या 69वर नेली. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले आणि भारताला पदकांची सत्तरी गाठून दिली. महत्वाचे म्हणजे एशियाड स्पर्धांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक 70 पदके मिळवली. या आधी गुआंगझू येथे झालेल्या 2010 सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 65 पदके मिळवण्यात यश आले होते. तर 1982 साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने 57 पदकांची कमाई केली होती. तीच कामगिरी करण्यात भारताला 2014च्या इंचियॉन आशियाई स्पर्धांमध्ये यश आले होते. याशिवाय, 2006 साली झालेल्या दोहा स्पर्धेत (53), 1962 सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (52) आणि 1951 सालच्या नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (51) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)