आशियाई स्पर्धा 13वा दिवस

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताचा बॉक्‍सर अमित पांघलने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 49 किलो वजनी गटात अमितने उपांत्य फेरीत फिलीपाईन्सचा आपला प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर मात केली आहे. 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेवश मिळवणारा अमित एकमेव बॉक़्सर ठरला आहे. अंतिम फेरीत अमितचा सामना उझबेगिस्तानच्या हसनशी होणार आहे.

त्याआधी भारताचा आघाडीचा बॉक्‍सर विकास क्रिशनला 75 किलो वजनी गटात आज कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. आपल्या उपांत्य सामन्यात कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानविरुद्ध खेळत असताना विकासच्या डाव्या डोळ्याच्या वर झालेल्या दुखापत झाली. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर विकास उपांत्य सामना खेळण्यासाठी फिट नसल्याचं घोषित करण्यात आलं. या कारणामुळे कझाकिस्तानच्या खेळाडूला अंतिम फेरीत चाल देण्यात आली व विकासला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

विकासचं आशियाई खेळांमधलं हे तिसरं पदक ठरलं. याआधी 2010 साली झालेल्या स्पर्धेत विकासने 60 किलो वजनी गटात सुवर्ण, 2014 साली झालेल्या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती.

दरम्यान स्क्वॉशमध्ये भारतीय महिलांनी मलेशियावर 2-0 ने मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या विजयासह भारताचं आणखी एक पदक निश्‍चीत झालेलं आहे. मात्र पुरुष संघाला उपांत्य फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला असल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)