जकार्ता:  भारटाला नेमबाजी क्रीडा प्रकारात आणखी पदक मिळाले आहे.  भारतीय नेमबाज खेळाडू सौरभ चौधरी  याने सुवर्णवेध घेतला आहे. भारतीय नेमबाज खेळाडू सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी १० मी एअर पिस्तुल विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पात्रता फेरीमध्ये सौरभने ४७७ गुणांची कमी करात पहिले स्थान पटकावले होते.

अंतिम फेरीत नेमबाजीच्या दोन फेऱ्या झाल्या तेव्हा सौरभ चौधरी दुसर्या क्रमांकावर होता तर अभिषेक वर्मा हा चौथ्या  क्रमांकावर होता. सौरभने १०१. ४ गुण  मिळवले तर अभिषेकने ९९. ४ गुण  मिळवले होते.  त्यानंतर एलिमिनेशन सुरु झाले.

एलिमिनेशनमध्ये सौरभ खाली घसरला १३९.४ आणि तिसऱ्या क्रमांकावर आला आणि अभिषेकने देखील संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. तिसऱ्या एलिमिनेशनमध्ये अभिषेकने प्रगती केली आणि तो १६० गुणांसह दुसर्या क्रमांकावर पोचला तर सौरभ १५९. ४ गुणांसह तिसर्या क्रमांकावर स्थिर राहिला.

चौथ्या एलिमिनेशन पर्यंत चार नेमबाज बहेफेकले गेले आणि चार राहिले त्यात पुन्हा सौरभ दुसर्या क्रमांकावर काबीज झाला. त्याने १८० गुण मिळवले. तर अभिषेकची  १७८. ९ गुणांसह तिसर्या स्थानावर घसरण झाली.
यानंतर १६ वर्षीय भारतीय सौरभ चौधरीने सुवर्ण पदक जिंकले तर अभिषेकने कांस्य पदकाला गवसणी घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)