जकार्ता : दोन वेळा ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला आशियाई स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर त्याची पुरुष ७४ किलोग्रॅम वजनी गटातून पदकाची अशा धूसर झाली आहे.

सुशील कुमारला बेहारीनचा कुस्तीपटू बाटीरोव्ह याने ३-५ असे हरवले.  त्याअगोदर पहिल्या सत्रात सुशील कुमार २-१ असा आघाडीवर होता. परंतु, बेहारीनच्या कुस्तीपटूने सामन्यात पुनरागमन करत दोनवेळच्या ऑलंपिक पदक विजेत्या खेळाडूला पराभवाचा धक्का  दिला.

दुसऱ्या सत्रात सुशीलने गुण मिळवण्याच्या दोन संधी निर्माण केल्या होत्या परंतु त्यावर गुण  मिळवण्यात तो अपयशी ठरला. त्याच्याविरोधी खेळाडूने निर्माण केलेल्या संधीवर गुण मिळवले आणि विजय साजरा केला.

या पराभवामुळे  सुशील हा पदक मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर  फेकला गेला असे नाही, जर बेहारीनचा कुस्तीपटू बाटीरोव्ह अंतिम सामन्यात पोहचला तर सुशील कुमारला कांस्य पदकाचा सामना खेळण्याची संधी ,हळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)