आशियाई स्पर्धा : सात्विक-चिराग जोडी पराभूत 

जकार्ता : पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी व चिराग शेट्टी या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या जोडीला मात्र दुसऱ्या फेरीचा उंबरठा पार करण्यात अपयश आले. पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग जोडीने हॉंगकॉंगच्या चूंग वाय व टॅम सीएच यांच्यावर सहज मात करीत विजयी सलामी दिली होती. परंतु दुसऱ्या फेरीच्या लढतीत चोई सोलग्यू आणि मिन हयुक कांग या कोरियाच्या सरस मानांकित जोडीविरुद्ध कडवा संघर्ष केल्यावरही सात्विक-चिराग जोडीला 17-21, 21-19, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्‍की रेड्डी या भारतीय जोडीनेही हॉंगकॉंगच्या एनजी वी आणि येऊंग एनटी यांचा फडशा पाडताना विजयी सलामी दिली होती. तसेच मेई कुआन चो आणि मेंग लीन यी या मलेशियन जोडीवर तीन गेममध्ये संघर्षपूर्ण मात करताना त्यांनी उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती. मात्र उपान्त्यपूर्व फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले. जिया यिफान व चेन क्‍विंग या चीनच्या जोडीने अश्‍विनी-सिक्‍की जोडीचा दुसऱ्या गेममधील प्रतिकार मोडून काढताना 21-11, 24-22 अशा विजयासह उपान्त्य फेरी गाठली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर मनू अत्री व सुमित रेड्डी या भारतीय जोडीला पुरुष दुहेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. जुनहुई ली आणि जुनचेन लियू या चीनच्या जोडीने मनू-सुमितचे आव्हान 21-13, 17-21, 25-23 असे कडव्या झुंजीनंतर मोडून काढले. त्याआधी महिला दुहेरीत ऋतुपर्णा पांडा व आरती सुनील या जोडीचे आव्हान संपुष्टात आले असून स्टार बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत, व एच. एस. प्रणय यांचेही पुरुष एकेरीतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)