आशियाई स्पर्धा: टेनिसपटू अंकिता रैना उपांत्यफेरीत दाखल, पदक निश्चित

जकार्ता: येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हीने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूरफेरीच्या सामन्यात तिने हॉंगकॉंगच्या चँग वोन्ग हीच ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.  त्यामुळे तिच्याकडून पदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत.

अंकिताने पहिल्या सेटपासून सामन्यात वर्चस्व गाजवले.  परंतु हाँगकाँगची खेळाडू सामन्यात परतण्याचे पर्यन्त करत होती.  पहिला सेट अंकिताने ६-४ असा जिंकला.

-Ads-

दुसऱ्या सेटमध्ये अंकिताचा खेळ अधिकच बहरला तिने विरोधी खेळाडूला या सेटमध्ये थोडीही संधी दिली नाही. हा सेट तिने ६-१ असा जिंकत सामना देखील आपल्या नावे केला.मागील महिन्यात थायलंड येथे झालेली नोंथाबूरी चॅम्पियनशीप स्पर्धा देखील अंकिताने जिंकली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)