आशियाई स्पर्धा: किदांबी श्रीकांतला पराभवाचा धक्का

जकार्ता: येथे सुरु असलेल्या  आशियायी स्पर्धेतून भारताचा पुरुष एकेरीतील स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत बाहेर फेकला गेला आहे. त्याला राउंड ऑफ थर्टीटू सामन्यात जागतिक क्रमवारीत २८व्या क्रमांकावर असणाऱ्या हॉंगकॉंगच्या वोन्ग विंग की विन्सेंटयाने पराभवाचा धक्का दिला. श्रीकांतने हा सामना २१-२३ आणि २१-१९ असा गमावला.

पहिल्या सेटपासूनच दोन्ही  खेळाडूंमध्ये गुण मिळवण्यासाठी चांगलीच लढत पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये  एकवेळ श्रीकांत ११-९ असा आघाडीवर होता. परंतु त्यानंतर हॉंगकॉंगच्या खेळाडूने सामन्यात पुनरागन करत पाहिलाय सेट २३-२१ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील श्रीकांतच्या खेळातील उणिवा शोधत त्याने श्रीकांतवर २१-१९ असा विजय मिळवला. या श्रीकांतला या पराभवामुळे स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)