आशियाई स्पर्धा : अंकिता रैनाचे कांस्य पदकावर समाधान

पालेमबंग  – आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले आहे. प्रतिस्पर्धी चीनची खेळाडू शुआई जैंग हिने अंकिता रैनाचा ४-६, ६-७ अशा सेटमध्ये पराभव केला. यामुळे रैनाला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. या कांस्यपदकासह भारताच्या खात्यात आतापर्यंत ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ९ कांस्य पदक जमा झाले आहेत. दरम्यान, याआधी सानिया मिर्झाने 2006 आशियाई स्पर्धेत रौप्य, तर 2010 आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.

तर दुसरीकडे पुरुष दुहेरी टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा व दिविज शरण या भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी जोडी जपानच्या केटो उसुगुगी आणि शॉ शिमुकोरो यांचा ४-६, ६-३, १०-८ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)