विश्वकरंडक खेळण्यासाठी प्रथम आशियाई स्तरावर भारताच्या फूुटबॉलची प्रगती व्हायला हवी. आशियाई क्रमवारीत पहिल्या दहात येण्याचे आमचे लक्ष्य असणार आहे. आशियातील इराण, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया आणि सौदी अरेबिया हे सध्याचे अव्वल संघ असून त्यांना मागे टाकण्याचे लक्ष्य साध्य करणे गरजेचे आहे, असे सांगून छेत्री म्हणाला की, जागतिक क्रमवारीतही हे संघ भारतापुढे आहेत. भारताचे जागतिक मानांकन 97 असून भारत आशियात 14व्या स्.स्थानावर आहे. फुटबॉल प्रगतीसाठी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असून त्यामुळे प्रेक्षकही सामने पाहायला येतील आणि लपलेली गुणवत्ताही समोर येईल, असेही छेत्रीने नमूद केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0