आशियाई विकास बॅंक विकासदराबाबत आशावादी

नवी दिल्ली – भारतातील आर्थिक विकासदर सन 2019-2020 पर्यत 7.6 टक्‍क्‍यावर पोहोचण्यांचा अंदाज अशियन डेव्हलपमेन्ट बॅंकेने दिलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. नोटाबंदी नोव्हेबर 2016 ला करण्यात आली होती. जीएसटी कर लागू करण्यात आला होता. यात मागील आर्थिक वर्षात 6.6 टक्‍के आर्थिक वाढीचा दर होता तर चालू वर्षात हा दर 7.3 टक्‍के आहे. पण ही सर्व परिस्थिती बदलून लवकरच आर्थिकदर स्थिरावणार असल्यांचे ही सांगण्यात येत आहे.

देशात उद्योग, व्यवसाय, शेती, व्यापार यांची विस्कटलेली व्यवहाराची घडी येत्या काळात स्थिर होऊन आपण जीएसटी व नोटाबंदी याच्या परिणामातून संथ चालू असलेले व्यवहार आता गती घेणार आसून याचा फायदा भविष्यात दिसून येणार आहे. खाजगी उद्योगाची कामगिरी चांगली झेप घेणार असल्याची चिन्हे आहेत. याबरोबर शेती क्षेत्रातील बाजारभाव समाधानकारक मिळत गेल्यास जीडीपी वाढण्यास सुरू होऊन 7.6 टक्‍के होण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)