आशियाई युवा मुष्टियुद्ध; भारताला तीन सुवर्णपदके

  युवा ऑलिम्पिकसाठी मात्र निराशा

बॅंकॉक  – विश्‍वविजेत्या नीतू घांघाससह तीन महिला भारतीयांनी सुवर्णपदकाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या आशियाई युवा मुष्टियुद्ध स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. परंतु या तिघींनी सुवर्णपदके मिळविलेल्या गटांचा युवा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्यामुळे त्यातील कोणतीही खेळाडू त्या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकली नाही.

महिलांच्या 48 किलो वजनगटाच्या अंतिम फेरीत भारताच्या नीतू घांघासने स्थानिक खेळाडू व विजयासाठी पसंती देण्यात आलेल्या निल्लाडा मीकून हिच्यावर मात करीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या लढतीसाठी हजर असलेल्या शेकडो प्रेक्षकांनी निल्लाडाला जोरदार पाठिंबा दिला. परंतु नीतूनेच अखेर बाजी मारली. महिलांच्या 64 किलो गटातील अंतिम फेरीत भारताच्या मनीषाने ताजिकिस्तानच्या इडिमोख खोलव्हावर 3-2 अशी संघर्षपूर्ण मात करीत सुवर्णपदक जिंकले.

तसेच महिलांच्या 69 किलो गटातील अंतिम लढतीत भारताच्या ललिताने कझाखस्तानच्या पैसेबायेव्हा माईयाचे आव्हान अत्यंत रंगतदार झुंजीनंतर मोडून काढथ तिसऱ्या सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. महिलांच्या 51 किलो गटांत अनामिकाला, तर 81 किलो गटांत साक्षीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. साक्षीला कझाखस्तानच्या गझल सादिकोव्हाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तर अनामिकाला कझाखस्तानच्याच झानसाया अबद्रैमोव्हा विरुद्ध कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागला.

तसेच स्पर्धेतील एकमेव भारतीय पुरुष स्पर्धक असलेल्या अंकित खतनालाही 60 किलो वजनगटांतील अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. थायलंडच्या आतिचाई फोएमसॅपने अंकितला पराभूत करताना सुवर्णाची निश्‍चिती केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)