आशियाई चॅम्पियन्स करंडक : भारतीय महिला हॉकी संघाचा चीनवर विजय 

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा 
डॉंगहे – वंदना कटारिया आणि पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट गुरजित कौर यांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा प्रतिकार 2-1 असा मोडून काढताना आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील आपली विजयी वाटचाल कायम राखली. भारतीय महिला संघाने अप्रतिम सांघिक कामगिरीचे दर्शन घडविताना चीनवर वर्चस्व गाजविले. लिलिमा मिन्झ, नवजोत कौर आणि वंदना कटारिया यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून भारतीय महिलांना चौथ्याच मिनिटाला खाते उघडता आले. त्यानंतर 11व्या मिनिटाला उदिताच्या कल्पक पासवर वंदना कटारियाने चेंडूला गोलची दिशा दाखविली, तेव्हा चिनी गोलरक्षक फारसे काही करू शकली नाही.

भारताच्या आक्रमणामुळे चकित झालेल्या चीनच्या महिलांनी पहिल्या सत्राअखेर 15व्या मिनिटाला पहिला गोल केला. या वेळी वेन डॅनने उत्कृष्ट मैदानी गोल केला. त्यानंतर सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना गुरजित कौरने 51व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल करीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. पहिल्या सामन्यात जपानचा 4-1 असा धुव्वा उडविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली. आता राऊंड रॉबिन फेरीतील यानंतरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघासमोर मलेशियाचे कडवे आव्हान आहे. ही लढत उद्या (गुरुवार) रंगणार आहे. या स्पर्धेतून जोएर्द मारिने यांचे महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून पुनरागमनही झाले आहे. त्याआधी त्यांनी पुरुष संघाचे प्रशिक्षख म्हणूनव सुमारे सात महिने काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)