आशियाई क्रीडा स्पर्धेतून लिअँडर पेसच्या माघारीने भारताला धक्‍का !

दुहेरीसाठी पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे पेसचा निर्णय 
पालेमबंग: भारताचा दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा लागला, असे त्याने म्हटले आहे. मात्र त्याने ऐन वेळी माघार घेतल्यामुळे भारतीय टेनिस संघाच्या पदकाच्या अपेक्षेला धक्‍का बसला असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक झिशान अली यांनी म्हटले आहे.
आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत 18 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांना गवसणी घालणाऱ्या 45 वर्षीय पेसला एकेरीतील खेळाडू सुमित नागल याच्यासह खेळण्यास सांगण्यात आले होते. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) देशातील अव्वल क्रमांकाची जोडी रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांना त्यांच्याच मागणीनुसार एकत्र खेळवण्याचा निर्णय घेतल्याने पेसला सुमितसह खेळण्याचाच पर्याय उरला होता. केंद्र शासनाच्या “टॉप’ योजनेतून वगळण्यात आल्याने याआधीच पेस नाराज झाला होता. मात्र तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय त्याने घेतला होता.
लिअँडर पेसने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, अत्यंत जड अंतःकरणाने मी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतो आहे. मला दुहेरीतील तज्ज्ञ जोडीदार द्यावा अशी विनंती अनेक आठवडे आधीपासून मी टेनिस संघटनेला करत होतो. मात्र त्यांनी मला दादच दिली नाही. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय राहिलेला नाही.
पेस म्हणाला की, रामकुमार रामनाथन खूप चांगला खेळाडू आहे. मला दुहेरीत त्याच्यासह खेळायला आवडले असते; पण एकेरीत त्याला पदकाची सुवर्णसंधी आहे. अशा स्थितीत रामला दुहेरीतही खेळायला लावून त्याच्यावरील ताण वाढवणे मला पटत नाही. पेसने याआधीच्या दोन आशियाई स्पर्दांमध्येही भाग घेतला नव्हता. यंदाच्या मोसमात आपले श्रीराम बालाजी, विष्णू वर्धन, पूरव राजा आणि जीवन हे दुहेरीत सरस कामगिरी करत आहेत. त्यांच्यापैकी एकाला माझ्यासह खेळता आले असते, यामुळे भारतीय टेनिस संघही अव्वल दर्जाचा झाला असता, असे सांगताना पेसने आपली नाराजी उघड केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)