#आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८: अरपिंदर सिंह, स्वप्ना बर्मन सुवर्णपदकाचे मानकरी

जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आज ११व्या दिवशी भारताने पदसंख्येमध्ये भर टाकली आहे. आज भारतातर्फे अरपिंदर सिंह या क्रीडापटूने ट्रिपल जंप या क्रीडा प्रकारामध्ये तर स्वप्ना बर्मन हिने महिलांच्या हेप्‍टाथलोन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. या दोन पदकांसह भारताची एकूण पदसंख्या ५४ एवढी झाली आहे.

तत्पूर्वी महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये आज भारताकडून दूती चंद या क्रीडापटूने रौप्य पदक पटकावले. तसेच टेबल टेनिस (दुहेरी) या क्रीडा प्रकारामध्ये भारताकडून अचंत शरथ कमल व मनिका बत्रा या जोडीने कांस्य पदकाची कमाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)