आशियाई कुस्ती स्पर्धेत ओंकार पाटीलला रौप्य, अनिल वाघमोडेला कांस्यपदक 

वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाचे मल्ल 
पुणे – इराणमधील तेहरान येथे दोन व तीन ऑगस्ट दरम्यान झालेल्या एशियन स्कूल बॉईज ग्रीको-रोमन व फ्रीस्टाईल रेसलिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलातील मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ओंकार पाटील याने 57 किलो वजनी गटात ग्रीको-रोमन प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तर अनिल वाघमोडे याने फ्रीस्टाईल गटात भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली.

वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुल येथे हे मल्ल सराव करीत आहेत. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष विजय बराटे, तसेच संकुलातील एनआयएस प्रशिक्षक संदीप पठारे, सियानंद दहिया, दिलीप पडवळ, परीक्षित पाटील, रामभाऊ जवळकर, संदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही मल्ल सराव करतात. हिंदकेसरी अमोल बराटे आणि इतर मल्लांनी दोन्ही पदकविजेत्यांचे अभिनंदन केले.

विजय बराटे म्हणाले की, सह्याद्री कुस्ती संकुल गेल्या 8-10 वर्षांपासून चांगले मल्ल तयार होऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावेत यासाठी प्रयत्नशील आहे. संकुलातील अनेक मल्ल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. मुलींमध्ये मनीषा देवेकर व सोनाली तोडकर, तसेच मुलांमध्ये विष्णू खोसे, रमेश इंगवले, विनायक मोळे, आकाश माने, राजू हिप्परकर यांसारखे राष्ट्रीय मल्ल आगामी स्पर्धेसाठी तयार करण्यात येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)