आशावादी गोष्टींचा गुच्छ पुढील दशकाचा हिरा घडवितो आहे! (भाग-१)

“हा नाताळ अन येणारे वर्ष तुम्हां सर्वांस सुखाचे जावो!”

ख्रिसमसच्या निमित्तानं रात्रीच्या वेळी घरोघरी जाऊन गायल्या जाणाऱ्या कॅरल्समधील हे बोल कानांवर पडले की चाहूल लागते ती ख्रिसमसची व त्यानंतर आठवड्यानं लागणाऱ्या नवीन वर्षाची. वरील ओळीत म्हटल्याप्रमाणं हा नाताळ व येणारं वर्ष सुखात जाण्यासाठी मुख्यत्त्वे दोनच गोष्टी महत्वाच्या, त्या म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद व संयम. कारण पवित्र बायबलमध्ये असं म्हटलंय की, “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो” (नीतिसूत्रें १०:२२).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदी मी मी म्हणणाऱ्या स्टार गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील काही शेअर्सचे भाव या वर्षात तब्बल ७६ टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत परंतु महत्त्वाची बाब अशी की, त्यांनी अशा शेअर्सच्या कंपन्यांमधून आपली गुंतवणूक काढून घेतलेली नाही, त्यामुळं इंग्रजीमध्ये एक म्हणआहे, Patience pays. असो, २०१९ आगमनापूर्वी २०१८ सरता सरता काही गोष्टी पाहू ज्या येणाऱ्या वर्षात महत्त्वाच्या ठरू शकतात.

मागील दोन आठवड्यांत बाजारानं चांगलीच उभारी घेतलीय म्हणजेच, पडलेल्या किंमतीत उत्तम कंपन्यांचे शेअर्स खरीदले गेलेत. त्यामुळं आपण अभ्यासपूर्वक निवडलेल्या उत्तम कंपनीचा भाव जरी पडला तरी घाबरून न जाता तो सांभाळायची तयारी ठेवणं व वेळ पडल्यास पडलेल्या भावात त्यातील खरेदी वाढवणं. उदाहरणंच द्यायची झाली तर परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी इंडियाबुल्स इंटिग्रेटेड सर्व्हिसेस, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, एनआरबी बेअरिंग्स, इंडियाबुल्स व्हेंचर्स व रेन इंडस्ट्रीज यान कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक २४ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे व गेल्या आठवड्यांत ह्या शेअर्समध्ये ३४ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.

आशावादी गोष्टींचा गुच्छ पुढील दशकाचा हिरा घडवितो आहे! (भाग-२)

आता उत्तम भावातील खरेदी म्हणजे काय हा प्रश्न नेहमीच पडत असतो. यावर वॉरेन बफे म्हणतात, “भाव म्हणजे जो आपण देऊ करतो, तर मूल्य अथवा किंमत म्हणजे जी आपणांस मिळते.” खरं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणं (व सांभाळणं) ज्यांच्या किंमतीत व भावात बरीच तफावत असते. म्हणजेच, शेअरची योग्य किंमत ठरवणं, त्याची चालू भावाशी तुलना करणं व भाव खाली असताना मार्जिन ऑफ सेफ्टी पाहून ते खरेदी करणं. शेअरचा भाव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समज, आकलन, बोध, इ. त्यामुळं प्रत्येकाचं गणित प्रत्येक कंपनीसाठी वेगवेगळं असू शकतं. एखाद्या नावाजलेल्या व बोलबाला असलेल्या कंपनीचा शेअर्स एखादी व्यक्ती ५० च्या पीई ला देखील खरेदी करेल परंतु दुसऱ्या चांगल्या कंपनीच्या बाबतीत त्याचा पीई १० च्या आत असताना देखील तो खाली येण्याची वाट पाहील. तसंच, प्रत्येक क्षेत्रागणिक देखील आपापले आडाखे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळं प्रत्येक शेअरचं मूल्य हे त्या कंपनीशी निगडीत जोखमीशी पडताळून पाहणं गरजेचं, ना की केवळ मागील वर्षातील न्यूनतम भाव आहे म्हणून तो शेअर खरेदी करणं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)