आव्हाळवाडी फाट्यावरील बेशिस्त पार्किंग

वाघोली- आव्हाळवाडी फाटा येथील केअर हॉस्पिटलसमोर बेशिस्तपणे दुचाकी आणि चार चाकींचे पार्किंग करून वाहतूक कोंडीला अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाईच होत नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे-नगर महामार्गावर आव्हाळवाडी फाटा येथील वाहनांच्या बेशिस्तीमुळे महामार्गावर कोंडी होत असल्याचा तक्रारी असतानाच केअर हॉस्पिटलसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनांकडून लावल्या जाणाऱ्या बेशिस्त पार्किंगची समस्या वाढू लागली आहे. या परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून मुख्य चौकामध्ये गाडी पार्किंग केली जाते. पार्किंग करताना रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडचण होईल याची देखील काळजी वाहनचालक घेत नाहीत. “नो पार्किंग’चे बोर्ड लावले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून गाड्या लावल्या जातात. यामुळे लोहगावमार्गे येणाऱ्या वाहनचालकांना व महामार्गावरील वाहनचालकांना हे पार्किंग अडचणीचे ठरत आहे. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ होत चालली आहे. पोलीस प्रशासनाकडून बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाईच केली जात नसल्याने बेशिस्त पार्किंगची समस्या अधिक बिकट होतआहे. पोलिसांनी कारवाई करून पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)