आव्हाळवाडीजवळ सहा दुकाने खाक

सिलेंडर काढताना तरुण जखमी, जीवितहानी टळली

वाघोली- वाघोली-आव्हाळवाडी (ता. हवेली) रस्त्यावर सातव पार्क येथील सहा दुकानांना सकाळी चारच्या सुमारास आग लागून साहित्य खाक झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्यामुळे पुढील मोठी हानी टळली. वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावर (सातव पार्क) बारा दुकाने आहेत. विविध व्यावसायिकांनी ही दुकाने भाडेतत्वावर घेतली आहेत. दि.29 मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास दुकानांना आग लागली. रस्त्याच्या प्रथमदर्शनी आठ तर लागुनच मागच्या बाजूला चार दुकाने आहेत. यामधील दोन दुकानांमध्ये दोघेजण रात्री झोपलेले होते. आग लागताच त्यांना झळ बसू लागली. त्यामुळे ते दोघेजण जागे झाले. दोघेही तत्काळ दुकानाच्या बाहेर आल्यामुळे जीवितहानी टळली. बाहेर आल्यांनतर त्यांनी लागुनच असलेल्या दुकानचालकांना आगीबाबत संपर्क करून माहिती दिली. तोपर्यंत आगीने सहा दुकानांना गिळकृंत केले होते. त्यांनतर दुकान चालकांसह नागरिकांनी धाव घेतली.

अग्निशामक दलाला कळवताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी तातडीने आग आटोक्‍यात आणली.
जवानांनी वेळीच आग आटोक्‍यात आणल्यामुळे शेजारील बाराही दुकाने आगीपासून सुरक्षित राहिली. रात्रीच्यावेळी दुकानात थांबलेल्या खुर्शीद आली या तरुणाने आग लागल्यानंतर दुकानात असलेल्या गॅस सिलेंडर जीव धोक्‍यात घालून बाहेर काढला. त्यावेळी त्याचा हात भाजला गेला. यावेळी सिलेंडरचा स्फोट झाला असता तर अजूनच मोठी हानी झाली असती, अशी प्रतिक्रिया घटनास्थळावरील नागरिकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)