आवास योजनेत महाराष्ट्र आघाडीवर; केंद्र शासनाने दिली आकडेवारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्हयांमध्ये १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.

या योजनेंतर्गत देशातील ११५ महत्वाकांक्षी जिल्हयांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील चार जिल्हयांचा यात समावेश आहे. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार,उस्मानाबाद व वाशिम या जिल्हयांचा समावेश आहे. या जिल्हयांतील ग्रामीण भागात १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.

मार्च २०१९ पर्यंत देशात १ कोटी २ लाख घरे बांधण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले. आजपर्यंत ५१ लाख घरे बांधून झाली असून उर्वरित घरे वेळेत बांधण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)