आवास योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी

कोरेगाव, दि. 5 (प्रतिनिधी) – मागेल त्याला घर योजनेतून 2022 पर्यंत वंचित घटकांना घरकुल मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी व्यक्‍त केले.
कोरेगांव नगरपंचायतीच्या प्रभाग 4 मधील प्रोफेसर कॉलनी परिसरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मनोहर राऊत या लाभार्थ्याच्या घरकुल उभारणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी रविंद्र पवार, मुख्याधिकारी पुनम कदम, नायब तहसिलदार विठ्ठलराव काळे, श्रीरंग मदने, नगरसेवक महेश बर्गे, संजय पिसाळ, किशोर बर्गे, सुनिल बर्गे, राहुल बर्गे उपस्थित होते.
श्रीमती सिंघल म्हणाल्या, आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्‍तींसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री शहरी आवास योजना हाती घेतली असून 2022 पर्यंत एकही घटक घरकुला पासून वंचित राहणार नाही. यासाठी शासनाने कृती कार्यक्रम आखला आहे. कोरेगांव नगरपंचायतीनेही या उपक्रमात लक्षणीय असा सहभाग नोंदवला असून शहरातील पहिल्या घरकुलाचे काम सुरु होत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्‍त केला.
प्रारंभी नगरसेवक महेश बर्गे यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी पुनम कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सदाशिव शिर्के यांनी आभार मानले.

कोरेगाव : घरकुल उभारणी शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, संजय पिसाळ, सुनिल बर्गे आदी. (छाया ः अधिक बर्गे)

-Ads-

फोटो – कोरेगाव घरकुल

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)