आवास योजनेअंतर्गत 794 कुटुंबांना भूखंड वाटप

भोर आणि वेल्हा तालुक्‍यांतील प्रस्ताव राखीव

पुणे – “पंतप्रधान आवास योजना’ अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. मात्र, लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही, अशा व्यक्तींना शासनाच्या वतीने भूखंड उपलब्ध करून दिले जात आहे. पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. भोर, वेल्हा आणि पुणे शहर वगळता इतर सर्व तालुक्‍यांतील 794 कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी भूखंड वाटप करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला 2022 पर्यंत हक्‍काचे घर देण्याची घोषणा केली होती. पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना घरकुल मंजूर झाले. मात्र, त्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम रखडले होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने भूखंड नसलेल्या कुटुंबांना घरकुलासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात महापालिका असल्याने येथे शहरी पंतप्रधान आवास योजना राबवली जात आहे. तर, भोर आणि वेल्हा तालुक्‍यांतील प्रस्ताव राखीव ठेवण्यात आले आहेत.

या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्याला घरकुल बांधण्यास अनुदान या घटकांची अंमलबजावणी केली जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान असून, घरकुल बांधकामासाठी शासकीय अनुदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल. तसेच कुटुंबाच्या मालकीचा खुला भूखंड किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर कच्च्या स्वरुपाचे घर किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर सुधारणा होऊ शकेल, असे घर असणे आवश्‍यक आहे. मात्र, ज्यांच्याकडे भूखंड नाही, त्यांना ते उपलब्ध करून दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)