‘आवास योजना’ फलदायी (भाग-२)

घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध आहे. पूर्वी केवळ गरीब वर्गासाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र, नंतर तिचा आवाका वाढवून मध्यमवर्गीयांसाठीही ती खुली करण्यात आली. मात्र, या योजनेअंतर्गत कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि कोणती कागदपत्र जमा करावे लागतात, याबद्दल विशेष माहिती नसल्यामुळे अनेकजण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेअंतर्गत घराच्या आकारावर निर्बंध असल्यामुळे शहरी भागांत जास्त लाभार्थी योजनेसाठी इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित भविष्यात ही अट रद्द होण्याची शक्‍यता आहे.

‘आवास योजना’ फलदायी (भाग-१)

‘आवास योजना’ फलदायी (भाग-३)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या योजनेची दुसरी अट अशी की, सरकारच्या अन्य कोणत्याही आवास योजनेअंतर्गत कुटुंबातील कोणीही यापूर्वी लाभ घेतलेला असता कामा नये. त्याचप्रमाणे कुटुंबातील एकालाच पंतप्रधान आवास योजनेत सहभागी होता येईल. कुटुंबातील दोन व्यक्तींना दोन घरांसाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करताना कुटुंबातील सर्व व्यक्तींचा आधार कार्ड क्रमांक देणे गरजेचे आहे. कुटुंब या संज्ञेत पती-पत्नी तसेच अविवाहित मुलगा, मुलगी यांचा समावेश करण्यात येईल. लग्नानंतर मुलगा किंवा मुलगी याच योजनेअंतर्गत स्वतंत्र घरासाठी स्वतंत्र अर्ज करू शकेल. पक्‍क्‍या घरांचा लाभ घेणारे आईवडील, त्यांची विवाहित मुले ही स्वतंत्र कुटुंबे मानली जातात. पण पती आणि पत्नी स्वतंत्रपणे या योजनेत घरासाठी अर्ज करू शकत नाहीत. त्यांचा मुलगा आणि सून, तसेच मुलगी आणि जावई यांच्या नावावरील एका घरासाठी अनुदान मिळू शकेल. यापैकी घराचा मालकी हक्क कोणाकडे असावा, की दोघांकडेही असावा, याचा निर्णय पती-पत्नीनेच घ्यायचा आहे.

ज्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये आहे, त्यांना 9 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. त्याच्या व्याजावर चार टक्‍क्‍यांचे अनुदान मिळते. त्यामुळे कर्जाच्या मासिक हप्त्यात 2158 रुपयांची बचत होते. वीस वर्षांच्या कालावधीत एकंदर बचत 2 लाख 39 हजार 843 रुपये इतकी होऊ शकते. वर्षाकाठी बारा ते अठरा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना घरासाठी बारा लाख रुपयांचे कर्ज मिळेल. त्याच्या व्याजदरावर तीन टक्के अनुदान मिळेल. 110 चौरस मीटर आकाराचे घर खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाईल. 12 लाख रुपयांवर 3 टक्के अनुदान प्राप्त करून हे कर्ज वीस वर्षांत फेडायचे आहे. त्याच्या व्याजावर मिळालेली एकूण सूट 2 लाख 30 हजार एवढी असेल. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत घरखरेदीसाठी 2 लाख 30 हजार रुपये सरकार देणार असल्यामुळे तेवढ्या रकमेची बचत होणार आहे.

ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांच्या आत आहे, त्यांना सहा लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज मिळू शकेल. त्या कर्जाच्या व्याजदरावर 6.5 टक्के सरकारी अनुदान मिळेल. मासिक हप्त्यात त्यामुळे 2 हजार 219 रुपयांची बचत होईल आणि 20 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीत एकंदर बचत 2 लाख 46 हजार 625 रुपये एवढी असेल. समजा, आपले वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये आहे, तर घरखरेदीसाठी 12 लाखांचे कर्ज मिळू शकते. त्याच्या व्याजदरावर सरकारकडून 3 टक्‍क्‍यांचे अनुदान मिळेल. त्यातून मासिक हप्त्यात 2200 रुपयांची तर परतफेडीच्या एकंदर वीस वर्षांच्या कालावधीत 2 लाख 44 हजार 468 रुपयांची बचत होईल. जर उत्पन्न 18 लाखांपेक्षा अधिक असेल, तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर 2.4 लाख रुपयांचा आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र, खरेदी करण्यात येत असलेले घर संबंधिताचे पहिलेच घर असायला हवे. पूर्वी कर्जाच्या परतफेडीची मर्यादा 15 वर्षे होती. मात्र आता ती वाढवून 20 वर्षे करण्यात आली आहे. त्याच्यावरील व्याजदरात सरकार अनुदान देत असल्यामुळे मोठी सवलत मिळत आहे.

– कमलेश गिरी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)