‘आवास योजना’ फलदायी (भाग-१)

घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध आहे. पूर्वी केवळ गरीब वर्गासाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र, नंतर तिचा आवाका वाढवून मध्यमवर्गीयांसाठीही ती खुली करण्यात आली. मात्र, या योजनेअंतर्गत कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि कोणती कागदपत्र जमा करावे लागतात, याबद्दल विशेष माहिती नसल्यामुळे अनेकजण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेअंतर्गत घराच्या आकारावर निर्बंध असल्यामुळे शहरी भागांत जास्त लाभार्थी योजनेसाठी इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित भविष्यात ही अट रद्द होण्याची शक्‍यता आहे.

स्वतःचे घर बांधण्याचे अनेकांच्या मनात असते;,पण सर्वांना ते शक्‍य होत नाही. पंतप्रधान आवास योजनेमुळे हे शक्‍य झाले आहे. घर खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. सुरुवातीला या योजनेची व्याप्ती केवळ गरीब वर्गापुरतीच मर्यादित होती; परंतु आता त्याअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची रक्कम वाढवून शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांपर्यंत या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 3 ते 6 लाख होती. आता ती वाढवून 18 लाख रुपये करण्यात आली आहे; परंतु पंतप्रधान आवास योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते आणि कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागतात, याबाबत अनेकांना माहिती नाही. अनेकजणांना या योजनेच्या अटी समजत नाहीत आणि परिणामी ते या योजनेपासून वंचित राहतात. या योजनेअंतर्गत कोणकोणते प्रवर्ग तयार करण्यात आले आहेत, कोणकोणत्या आर्थिक उत्पन्न गटातील लोक याचा लाभ घेऊ शकतात, सरकारकडून कोणाला किती अनुदान मिळू शकते आणि नेमकी कोणती व्यक्ती योजनेसाठी अर्ज करू शकते, याची माहिती असणे गरजेचे आहे.
ज्याला या योजनेअंतर्गत घर हवे असेल, त्याने प्रथम आपण कोणत्या उत्पन्न गटात येतो, हे पाहायला हवे.

‘आवास योजना’ फलदायी (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘आवास योजना’ फलदायी (भाग-३)

जर तीन ते सहा लाखांच्या दरम्यान उत्पन्न असेल, तर संबंधिताला व्याजावर अधिक अनुदान मिळेल. सहा ते बारा लाख उत्पन्न गटातील तसेच बारा ते अठरा लाख उत्पन्न गटातील व्यक्तींना अनुदान कमी मिळेल. एक जानेवारी 2017 रोजी या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी मध्यमवर्गीय म्हणजे एमआयजी (मीडियम इन्कम ग्रुप) व्यक्तींच्या दोन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. सहा ते बारा लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची एक तर बारा ते अठरा लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची दुसरी श्रेणी आहे. या उत्पन्नगटांमधील व्यक्तींना पंतप्रधान आवास योजनेत सहभागी व्हायचे असल्यास काही अटी आहेत. सर्वांना घराचा लाभ मिळावा, हाच योजनेचा उद्देश असला, तरी या दोन श्रेणींमधील व्यक्तींकडे एक घर असेल, तर दुसऱ्या घरासाठी त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. ज्याच्याकडे पक्के घर नाही, त्यालाच या योजनेत सहभागी होता येते.

– कमलेश गिरी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)