आवाडवाडीत एकास हॉकी स्टीकने मारहाण

सातारा – किरकोळ कारणाच्या भांडणावरून आवाडवाडी, पो. अंबेदरे, ता. सातारा येथे एका तरुणास रस्त्यात अडवून हॉकी स्टीकने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की, विशाल संपत गायकवाड (वय 32, रा. आवाडवाडी) याचे प्रफुल्ल चंद्रकांत गायकवाड यांच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.

यात राग मनात धरून प्रफुल्ल शिवीगाळ करीत होता. त्यावर विशाल याने शिवीगाळ करू नको, असे सांगितले. त्यावरून प्रफुल्लने विशालच्या डोक्‍यात हॉकी स्टीक मारली. यात विशाल जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)