आवडत्या सेलिब्रिटीजसह सोनी ये! च्या कार्टून्सची बालदिन विशेष पार्टी

मुलांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केल्यानंतर सोनी ये! वाहिनीवरील गुरू आणि भोले या सांगीतिक जोडीने मुलांच्या आवडत्या सेलिब्रिटींसह मुलांना खास बालदिनानिमित्त सरप्राईज दिले. या सांगीतिक जोडीने मुलांच्या आवडत्या सेलिब्रिटींबरोबर नृत्यासाठी पावले थिरकवली आणि या सेलिब्रिटींना भेटण्याची संधीही त्यांनी मुलांना दिली.

इंडियन आयडॉल या शोमधील संगीत क्षेत्रातले दिग्गज विशाल ददलानी, नेहा कक्कर आणि उषा उत्थुप तसेच, होस्ट मनीश पॉल यांच्यासह यायच्या या पात्रांनी मुलांसोबतच सेलिब्रिटींचीही मने जिंकून घेतली.

भोले याने मनीश पॉलसह सादर केलेला परफॉर्मन्स बघण्यासारखा होता आणि दोघांच्याही संगीतप्रेमामुळे गुरूबरोबर नेहा हिने केलेले हमिंग व पोझिंगसुद्धा प्रेक्षकांना रमवणारे आणि खिळवून ठेवणारे होते. स्पर्धकांसोबतही या पात्रांनी खूप धमाल केली आणि हा एकूण अनुभव त्यांनी अविस्मरणीय केला.

इथेच ही धमाल संपली नाही. तर, यंदाच्या बालदिनी अल्लादिन हे मुलांसाठीचे खास आकर्षण ठरले. अल्लादिन – नाम तो सुना होगा या मालिकेच्या सेटवर सुपर किड किक ओ याने सिद्धार्थ निगम याची भेट घेतली आणि आपल्या आकर्षक हालचालींमधून आपली जादू त्याने पूर्ण सेटवर पसरवली. अनेक किक्स आणि नृत्याच्या अनुभवाने हा इव्हेंट अत्यंत अविस्मरणीय बनला.

समाजातल्या सर्वच स्तरातल्या मुलांसाठी यंदाचा बालदिन खास करण्यासाठी सोनी ये! वाहिनीने कंबर कसली होती. यात ऑन-एअर धमाल, डिजिटल स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)