पिंपरी – या आठवड्यात मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांची आवक मात्र सलग दुसऱ्या आठवड्यात वाढली आहे. आल्याची आवक वाढूनही भाव मात्र तेजीत राहिले. याशिवाय बटाटा व टोमॅटोची आवक घटली आहे. तर कांदा, मिरची, फ्लॉवर व लिंबाची आवक मात्र वाढली आहे. आल्याची आवक दोन क्विंटलने घटूनही भाव 4500 रुपयांवर स्थिरावला.

फळभाज्यांची एकूण आवक 948 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 15 हजार 130 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 26 क्विंटलने घटली आहे, तर पालेभाज्यांची आवक एक हजार 580 गड्ड्यांनी वाढली. कांद्याची 249 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 13 क्विंटलची वाढ झाली असुन, सरासरी भावात 100 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. बटाट्याची 123 क्विंटल आवक झाली असून, एक क्विंटलने घट झाली असून, भाव मात्र 100 रुपयांनी घटले. भेंडीची आवक सात क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले. गवारीची आवक पाच क्विंटलने वाढुन, भाव 500 रुपयांनी घटले. तसेच टोमॅटोची आवक 12 क्विंटलने घटुनही भाव मात्र 50 रुपयांनी वधारला. मटारची आवक एक क्विंटलने वाढुन, भावात 1500 रुपयांची घट झाली. घेवड्याची आवक पाच क्विंटलने घटून भाव250 रुपयांनी वाढले. दोडक्‍याची आवक तीन क्विंटलने वाढून, भाव 500 रुपयांनी वधारले. लसणाची आवक सात क्विंटलने घटून भाव मात्र 100 रुपयांनी घटला.

मिरचीची आवक तीन क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. दुधी भोपळ्याची आवक पाच क्विंटलने वाढून भाव 500 रुपयांनी घटले. कारल्याची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 650 रुपयांनी वधारले. गाजराची आवक स्थिर राहून, भाव मात्र 450 रुपयंनी घटले. फ्लॉवरची आवक वीस क्विंटलने वाढून भाव मात्र 500 रुपयांनी वधारले. कोबीची आवक तेरा क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले. वांग्यांची आवक सहा क्विंटलने घटली असून, भाव मात्र 500 रुपयांनी वाढले. लिंबांची आवक 20 क्विंटलने वाढुन, भावात 1000 रुपयांची घट झाली.

वालवरची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 900 रुपयांनी वधारले. शेवग्याची आवक चार क्विंटलने वाढून, भावात 1750 रुपयांची वाढ झाली. ढोबळी मिरचीची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी वाढले. घोसावळ्याची आवक एक क्विंटलने घटून, भाव 400 रुपयांनी वधारले. कैरीची पाच क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. तोंडल्याची एक क्विंटल आवक वाढून भाव 250 रुपयांनी वधारले. बीटची दोन क्विंटल आवक होऊन, भाव 1250 रुपयांवर स्थिरावला. डांगरची एक क्विंटल आवक होऊन, भाव 1250 रुपयांवर स्थिरावला.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या पाच हजार 625 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची दोन हजार 280 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची एक हजार 680 गड्ड्या, मुळे 200 गड्ड्या, पुदीना 200 गड्ड्या, पालक तीन हजार 230 गड्ड्या, चवळीच्या 1000 गडड्या, राजगिऱ्याच्या 200 गडड्या तर कांदापातीच्या 715 गडड्‌यांची आवक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)